नाशिक : जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करावयाच्या २० राजकीय पदाधिकाऱ्यांची नाव राज्य सरकारकडे पाठवली आहेत. परंतु त्याला अद्यापही मुहुर्त लागलेला नाही. परंतु २० पैकी ७ सदस्यांची नियुक्तीचे आदेश शासनाने काढले असून जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे असताना विशेष निमंत्रित सदस्य निवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचेच वर्चस्व दिसून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात याठिकाणी मोठी नाराजी दिसून आली आहे.
हेही वाचा….“पक्ष फुटलाय हे काॅंग्रेस ठरवू शकत नाही”, जागावाटपावरून काॅंग्रेस अन् ठाकरे गटात वाकृयुद्ध
नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे पालकमंत्री आहेत. परंतु जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अजित पवार गटातील ७ जणांची नियुक्ती केली आहे. याठिकाणी पुन्हा एकदा अजित पवार गटाचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीवर ७ अशासकीय सदस्यांपैकी तीन सदस्य अजित पवार गटाचे आहेत. सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री पद असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाकडून रंजन ठाकरे, रवींद्र पवार, प्रेरणा बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
हेही वाचा...“नाना पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून..,” राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात
दरम्यान, शिवसेनेचे दोन आमदार असतानाही पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मर्जीतील सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. अर्थात भाजप आणि राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. त्यामुळे त्यांना अधिक सदस्य मिळणे निश्चित होते.
READ ALSO :
हेही वाचा….माढा लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा ; राष्ट्रवादीच्या संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट
हेही वाचाफडणवीसांनंतर शिंदेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…१२+१२+१२+१२..! लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचा जागावाटपाचा फॉर्म्युला, आंबेडकराचं इंडिया आघाडीला पत्र
हेही वाचा..राष्ट्रवादी अजित पवार गटात इन्कमिंग’ सुरू, अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
हेही वाचा…पोलिसांसमोरच कोयता गॅंगचा उच्छाद ..! हाच आहे का देवाभाऊंचा सुपरफास्ट सुरक्षा पॅटर्न? रोहित पवारांचा सवाल