पुणे : खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. त्याची सांगता आज शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्याधिकारी कार्यालयाजवळ होत आहे. याचदरम्यान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने यामोर्चावरून टिका करतांना दिसत आहे. यातच एका भाषणात शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं होतं. त्यावरून मिटकरी यांनी लवांडे यांना डिवचलं. त्याच आता लवांडे यांनी मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर…
अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मावळमधून पार्थपवारांना निवडून आणून दाखवावं, असं चॅलेंज विकास लवांडे यांनी दिलं होतं. त्यावर खासदार कोल्हे साहेब आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपीय सभेत परवा कुणी झाकणझुल्या अजितदादांनी स्वत: च्या मुलाला मवाळमधून निवडून आणावं असा सल्ला देत होता. २००९ साली याला शिरूर विधानसभेत जनतेने दाखवलेली लायकी बघा. अवघी २४८६ मते म्हणजे मतांच्या एकूण २ टक्के होती. अशी टिका अमोल मिटकरी यांनी केली होती.
हेही वाचा..“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला
त्यावर विकास लवांडे यांनी मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही. कुणाशीही मी आजपर्यंत कसलीही गद्दारी व विश्वासघात केलेला नाही. मी कायम पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारनिष्ठ आहे. मी आजपर्यंत कधीच कुठेही लाचार झालो नाही. याचा मला अभिमान आहे. मात्र काही विचारशून्य व लाभार्थी लोक मूळ मुद्यावर बोलू शकत नसल्याने व्यक्तिगत पातळीवर येऊन बोलतात कारण सत्य लबाड व्यक्तीला नेहमी अस्वस्थ करते. असा जोरदार घणाघात विकास लवांडे यांनी मिटकरींवर लगावला.
मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही. कुणाशीही मी आजपर्यंत कसलीही गद्दारी व विश्वासघात केलेला नाही. मी कायम पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारनिष्ठ आहे. मी आजपर्यंत कधीच कुठेही लाचार झालो नाही. याचा मला अभिमान आहे. मात्र काही विचारशून्य व लाभार्थी लोक मूळ मुद्यावर बोलू…
— Vikas Lawande (@VikasLawande1) December 29, 2023
खासदार कोल्हे साहेब आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपीय सभेत परवा कुणी “झाकणझुल्या” अजितदादांनी स्वतःच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला देत होता 2009 साली ह्याला शिरूर विधानसभेत जनतेने दाखवलेली लायकी बघा अवघी 2486 मते – एकूण मतांच्या २% 😄@kolhe_amol pic.twitter.com/hUyevLcpk5
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली
हेही वाचाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?