मुंबई : आज राज्याच्या आजी माजी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पोस्टर, तसेच वर्तमानपत्र, टिव्हीवर कोणत्याही प्रकाराची जाहिरात न देण्याचे भाजपच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च हा पुरग्रस्त लोकांनासाठी देण्यात यावा असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. यातच आज अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी
त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत- कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
“तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यासंदर्भात एक पोस्ट देखील केली आहे.
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?
रोहित पवार यांनी अजित पवारांना शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील स्ट्रेट फॉरवर्ड नेते, कामासाठी दादा व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त मन: पुर्वक शुभेच्छा. दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, आहे. रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील वाढदिवसानिमत्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
Read also
- तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल
- महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’..; रोहित पवारांच्या अजित दादांना हटके शुभेच्छा
- “शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
- नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
- एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक