मुंबई : आज राज्याच्या आजी माजी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पोस्टर, तसेच वर्तमानपत्र, टिव्हीवर कोणत्याही प्रकाराची जाहिरात न देण्याचे भाजपच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च हा पुरग्रस्त लोकांनासाठी देण्यात यावा असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यासंदर्भात एक पोस्ट देखील केली आहे.
“उद्धव ठाकरे आजारी पडलेत तेव्हाच शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची चाचपाणी सुरू केली”
रोहित पवार यांनी अजित पवारांना शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील स्ट्रेट फॉरवर्ड नेते, कामासाठी दादा व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त मन: पुर्वक शुभेच्छा. दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, आहे. रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील वाढदिवसानिमत्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’ व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks दादा यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! pic.twitter.com/FgZH2KOWBH— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2022
Read also
- “शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
- नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
- एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक
- राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी
- “तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर