मुंबई : आगामी काळात नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी आज विधानसभेत कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही सभागृहातील नेते, मंत्री उपस्थितीत होते. हिवाळी अधिवेशनला येत्या 19 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव
सुरूवातीला विधानभवनात विधानसभेची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, तसेच इतर शिंदे सरकारमधील मंत्री उपस्थित होते.
“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर, तर बारामतीतून 51 हजारांचे बक्षीस”
त्यानंतर विधानभवनातच विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पाडली. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेच्या उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर जहरी टिका केली होती. त्यानंतर पुण्यात शाईफेक प्रकरण घडलं. त्यावरून मग चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना शाई फेक प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्याचं आवाहन दिलं होतं. त्यावरून काल अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडांजगी बघायला मिळाली होती.
Read also
- “आज पुणे, तर उद्या संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल”, संजय राऊतांचा इशारा
- मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन
- पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
- पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
- शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका