पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून महापुरूषांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुण्यात आज सर्वपक्षीय नेत्यांकडून पुणे बंदची हाक देण्यात आली असून मोर्चा सुरू आहे. यामध्ये भाजप खासदार उदयनराजे हे देखील या मोर्चा सहभागी झाले आहेत.
“प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणा”; अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
डेक्कन येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा अलका टॉकीज, लक्ष्मी रोडवरून पुढे लाल महाल याठिकाणी जाणार आहेत. या मोर्चात राजकीय संघटना, व्यापारी संघटना, तसेच पुण्यातील सर्वच संघटनांसोबत 40 मुस्लिम संघटनांही यामध्ये सहभाग घेतला आहे. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
राज्यपालांविरोधात राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळेच आज पुणे बंद ची हाक दिली आहे. त्यामुळे सकाळापासून शहारतील हॉटेल, दुकाने बंद ठेवल्याने सगळीकडे शुकशुकाट बघायला मिळत आहे. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी साडे नऊ वाजता मोर्चा काढण्यात आला आहे.
“महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”; शिवसेना आक्रमक
यादरम्यान लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकात जाणार आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या मार्गावर लक्ष्मी रस्ता परिसरात दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले आहे. तर हडपसर,कात्रज, नगर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, येरवडा परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Read also
- पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
- शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव
- “चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर, तर बारामतीतून 51 हजारांचे बक्षीस”
- “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेऊन आयत्या बिळावर नागोबाची भूमिका घेतली”; भाजपचा घणाघात