पुणे : महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल शाई फेकरण्यात आली होती. याप्रकरणावरून शाई फेकरणाऱ्याला काल अटक करण्यात आली तर ११ पोलिसांचं निलंबण देखील करण्यात आले. तर व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका पत्रकाराला देखील पोलिसांनी अटक केली होती. यावर आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली असून सर्वांवरील गुन्हे मागे घ्या. अन् हा वाद इथेच थांबवावा असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
“मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत .
“नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं
शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- पाटलांचं तोंड काळं केलं तर डोक्याला काळी पट्टी बांधली, मग महापुरूषांचा अवमान केला तेव्हा कुठे होता? राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”; शिवसेना आक्रमक
- “शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ”
- “राज्यपालांचं ते पत्र कधीचं? मग ते आत्ताच कसं समोर आलं?” अमोल कोल्हेंचा सवाल
- “दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका