पुणे : दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही. असा टोला लगावत राहुल गांधी लोकांना भ्रमित करत असल्याची टिका भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. सध्या काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा सध्या राजस्थान मध्ये असून त्या यात्रेचा शेवट काश्मीरमध्ये होणार आहे. त्यावरून त्यांनी टिका केली आहे.
“१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तुम्हाला तारक मेहता का उलटा चश्मा बघायची गरज नाही, इथंच राऊल गांधी यांचा उलटा दिमाग पाहता येईल. तसेच राहुल गांधी यांनी नेहमीच मातेच्या मागे उभं राहुन राजकारण केलं आहे. आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहुन राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरू आहे. कुठे आहे तुमचा पुरूषार्थ असा सवाल देखील पुनम महाजन यांनी राहुल गांधी यांना केला आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
विर्ले पार्ले विधानसभेत जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित सभेत पुनम महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. भारत जोडो यात्रेनिमित्ताने राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते राजस्थान असा पायी प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी आपली दाढी तशीच ठेवली असून ती जास्तच वाढलेली दिसत आहे. राहुल गांधी यांचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून पुनम महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे.
नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
दरम्यान, भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच भारत जोडो यात्रेला आजपर्यंत 90 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.
विले पार्ले विधानसभेत ‘जागर मुंबईचा’ अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेला आमदार, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री आशिष शेलार जी आणि आमदार श्री पराग अळवणी जी यांच्या समवेत संबोधित केले.#जागर_मुंबईचा pic.twitter.com/42tc0MO6GH
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) December 11, 2022
Read also
- “मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
- “नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं
- खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
- “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
- “शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला