मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातही जामीन मंजूर झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात तुरूंगात डांबण्यात आले होते. त्यांना इडीच्या गुन्हात या अगोदरच जामीन मंजूर झाला होता. मात्र अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जामीनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके, ढोल वाजवून आनंद साजरा करण्यात आला. तर त्यांना १ लाख जातमुचलक्यावर त्यांची सीबीआय गुन्हांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
अनिल देशमुख यांना सीबीआय गुन्हांत जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये त्यांना मुंबई सोडून बाहेर कुठेही जाता येणार नाही. तसेच त्यांचा परदेशातील पासपार्ट देखील जमा करण्यात सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना दर बुधवारी सीबीआय कार्यालयात दहा ते १२ या दरम्यान हजेरी लावावी लागणार आहे. असं अनिल देशमुख यांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी म्हटलं आहे.
शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”
तसेच १२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, कोणतेही पुरावे नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारे सर्व खोटे आरोप झाल्यानंतर राजीनामा देऊन निधळ्या छातीने चौकशीला समोर जाणारे राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचे अभिनंदन असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तर अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. भाजपच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांच्या देशातील विदारक चित्राचा भाग आहे. असं काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
“बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना 100 कोटी वसुली केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना तब्बल 13 महिने तुरूंगावासात भोगावा लागला. आज न्यायमुर्ती एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठांने सीबीआय प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.या अगोदर इडीच्या गुन्हामध्ये त्यांना मागील महिन्यातच जामीन मंजूर झाला होता. मात्र त्यांच्यावर सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला होता. त्याआधी इडीच्या गुन्हामध्ये त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. याविरोधात इडी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. मात्र तिथे इडीचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलं नव्हतं. अन् त्यांना जामीन मिळाला होता.
१)१२० धाडी ,६ वर्षाच्या नातीची चौकशी, कोणतेही पुरावे नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारे सर्व खोटे आरोप झाल्यानंतर राजीनामा देऊन निधळ्या छातीने चौकशीला समोरी जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व निर्भिड योद्धे श्री अनिल देशमुख साहेब आपले अभिनंदन#सत्यमेवजयते pic.twitter.com/gqEIalqmCq
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 12, 2022
Read also
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
- नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
- राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”
- “खोटं कलम लावून त्याला आयुष्यात उठवण्याचा कुणाचा डाव असेल तर..” शाईफेक प्रकरणावरून रूपाली पाटलांचा इशारा
- चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण…! पोलीस निलंबित, पत्रकारांना अटक, अन् वाचाळवीर नेत्यांची जीभ मात्र मोकाट