नागपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागुपरात विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली. तसेच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाषणात उल्लेख न केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला खोचक टोला हाणला आहे.
नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदि उपस्थित होते. मात्र भाषणाची सुरूवात केल्यानंतर व्यासपीठावरील सगळ्याचं नेत्यांची नावे घेतली परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही.
“महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
यावरून नितीन गडकरी यांचा ज्याप्रकारे उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते कुठल्याही नागपुरकरांना पसंत पडणार नाही. वास्तविक या सर्व कामांसाठी खरी मेहनत ही केवळ आणि केवळ गडकरी यांचीच आहे. असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही. तसेच मोदी यांचे 11 सितारे नेमके कोण हे यावरून सिद्ध झाले, अशी खोचक टिप्पणी देखील अमोल मिटकरी यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
त्याचबरोबर भाजपकडून होणारा सातत्याने महापुरूषांचा अपमान, भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माी यांच्याकडून सातत्याने होणारे मराठी भाषिकांवरील हल्ले, याबाबत सरकार साधा उल्लेख देखील पंतप्रधान यांच्या आजच्या भाषणात नसल्याने अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागपुर शहरात येऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नावाचा साधा नामोल्लेख ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडुकन न होणे ही बाब काही मनाला पटली नाही. मोदीजींचे ११ सितारे नेमके कोण हे यावरून सिद्ध झाले.#समृध्दीमहामार्ग
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 11, 2022
Read also
- 50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक
- “मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”
- “भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे
- “मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
- “मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”