पुणे : महापुरूषांवर केलेल्या टिकेनंतर समता परिषदेने आज आक्रमक भूमिका घेतली. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमातून बाहेर पडत असताना एका व्यक्तींनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली. यामुळे राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यातच संबंधित व्यक्तींची पोलीस चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच हिमंत असेल तर समोर येऊन लढा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा… हा उद्धाराचा राजमार्गच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना दिला. महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विषमता निर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालविला आणि त्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविले. असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी त्यावर भाष्य केलं.
“राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महात्मा फुले हे त्या काळातील एक प्रथितयश उद्योगपती होते आणि ज्ञानाचा महासागर असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली केली हे जगजाहीर आहे. एका नेत्यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आपल्या महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे हे दिसून येत आहे.त्यामुळे कोणीही अशी वक्तव्य करताना प्राथमिक शिक्षणाचे धडे घ्यावेत हीच आमची माफक अपेक्षा आहे.
“अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार
दरम्यान, मी कुणाला घाबरणार नाही. हिमंत असेल तर समोरे या. महाराष्ट्रात झुंडशाही चालणार नाही, तसेच मी चळवळीतला माणुस असल्याने सगळ्याच कार्यक्रमाला जाणार. असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा…हा उद्धाराचा राजमार्गच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना दिला. महात्मा फुले यांच्या सामाजिक,शैक्षणिक,विषमतानिर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालविला..1/2@ChDadaPatil
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 10, 2022
Read also
- चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
- पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- “मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी
- नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
- “महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा”; उद्धव ठाकरेंची मागणी