नागपुर : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दि. ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्याचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकानीही मोदीजीचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केले.
फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम नागपूर येथे होईल. याखेरीज नागपूर ते शिर्डी मार्गावर आठ ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाहतील. त्या त्या ठिकाणी भाजपाचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यांनी सांगितले की, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागात उद्योगधंद्याची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.
“उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाचा आराखडा करून घेतला आणि कामाला सुरुवात केली. त्याच्यामुळे महामार्गाचे काम झाले. महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्याचे आभार मानतो. महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी एकनाथ शिंदे संबंधित खात्याचे मंत्री होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण वेळ दिला. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामार्गाच्या उरलेल्या बाबी पूर्ण करतानाच तो गोंदियापर्यंत पुढे नेण्याचे जाहीर केले आहे. असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरचे खासदार झाल्यानंतर हे शहर सर्वोत्कृष्ट होण्यासाठी ध्यास घेतला. मेट्रो, उड्डाणपूल अशा अनेक योजना मंजूर करून घेतल्या. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात ठिकठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण होत आहे व त्यामुळे महाराष्ट्राची क्षमता वाढत आहे.
Read also
- “महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा”; उद्धव ठाकरेंची मागणी
- “लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”
- “राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
- “अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार
- विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक लांबणीवर..! 21 जागा ही झाल्या रिक्त