मुंबई : विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक पुढील सोमवारी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होणार नाही. सहा आमदारांची मुदत संपल्याने 78 सदस्यीय विधान परिषदेतील 21 जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी रिक्त असलेल्या सभापतीपदाची निवडणुक पुढील सोमवारी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होणार नाही. त्यामुळे ही निवडणुक आणखी लांबणीवर पडली आहे.
संजय राऊत पुन्हा न्यायालयात..! आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू
मतदारसंघातील 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असल्या किंवा 75 टक्के मतदार असेल तरच निवडणुक घेता येते, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. या निकलात नऊ विधानपरिषद मतदार संघ बसत नाहीत. यामुळे नऊ मतदारसंघांत लगेचच निवडणुक होणार नाही.
“सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत गेल्या जुलैमध्ये संपली. तेव्हापासून सभापतीपद रिक्त आहे. पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. सभापतीपदाची निवडणुक लवकर व्हावी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
“मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा हिवाळी अधिवेशन नागपुर येथे 19 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आता कुणाला संधी मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
- “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला
- शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
- “पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव” ; सुप्रिया सुळे
- “चड्डी गॅंगनी कितीही प्रयत्न केला, तरी बहुजन महापुरूषांची उंची कमी होणार नाही”; राष्ट्रवादीची जहरी टिका