पुणे : हिंदुह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदें यांच्या गाडीचं स्वारथ्य हे देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांचे फोटो, व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाले. यातच आता एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.
“सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, पण त्यांनी जास्त टीका करू नये”; आठवलेंचा सल्ला
समृद्धी महामार्गावर याआधी मी ड्रायव्हिंग केलं आहे. त्यामुळे त्या दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचा मूड होता. तेच म्हणाले मी चालवतो तुम्ही बाजूला बसा. आता ड्रायव्हिंग न येणारा बाजूला बसला असेल तर त्याला भीती अजिबात नसते. पण मला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे थोडी भीती वाटली होती. कारण धाकधूक मनात असते. पण फडणवीसांनी कमाल ड्रायव्हिंग केलं. ते तर पट्टीचे ड्रायव्हर निघाले असं एकनात शिंदे म्हणाले.
“मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार
समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मोदींनी देवेंद्र फडणवीसांच्या ड्रायव्हींग तारीफ केल्याचं शिंदेंनी म्हटलं. ते म्हणाले की, जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटलो तेव्हा त्यांनीही समृद्धीवरील टेस्ट ड्राईव्हबाबत विचारलं. मला मोदीजींनी कैसा रहा सफर, किधर है आपके साथी असं मला आवर्जून विचारलं. तसेच समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधान मोदीही उत्सुक असल्याचंही ते म्हणाले.
Read also
- “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला
- शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
- “पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव” ; सुप्रिया सुळे
- “चड्डी गॅंगनी कितीही प्रयत्न केला, तरी बहुजन महापुरूषांची उंची कमी होणार नाही”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- संजय राऊत पुन्हा न्यायालयात..! आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू