पुणे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या विरोधकांवर चांगलीच तोफ डागत आहेत. महाप्रबोधन सभेतून सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन विरोधकांवर प्रखर शब्दात हल्लाबोल करीत आहेत. यातच आता सुषमा अंधारे यांना शिवसेनेत टिका करण्यासाठीच आणलं असून त्यांनी जास्त टिका करू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
सुषमा अंधारे यांना टिका करण्यासाठीचं शिवसेनेत आणण्यात आलं आहे. सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या. त्या संघर्षशील अशा नेत्या आहेत. त्या सक्रिय आहेत. सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांना उपनेतेपद दिलं आहे. त्या टिका करण्यात एक्सपर्ट आहेत. पण त्यांनी सारखी टिका करू नये, असं रामदास आठवले म्हणाले.
“आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
अलिकडेच वंचितने उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, शिवशक्ती आणि भीमशक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एकत्र आली होती. त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असतील, तर तो अधिकार त्यांना आहे. त्यांनी एकत्र यावं, पण, त्याचा फारसा परिणाम पडणार नाही. असंही ते म्हणाले.
“पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
दरम्यान, आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने मोठी रणनीती आखली आहे. शिवसेनेचे अनेक नेते सध्या महाराष्ट्र दौरा करीत आहेत. खासकरून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर टिका केली जात आहे. यामध्ये सुषमा अंधारे सध्या राज्याच्या राजकारणात चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत.
Read also
- “मनसे मला विरोध करणार नाही”; बृजभूषण सिंह पुण्यात येण्याच्या अगोदर राज ठाकरेंंचे मानले आभार
- “उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवलंय”; शिवसेनेच्या नेत्याची टिका
- “यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
- “महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
- “अमित शहांची भेट घ्यायला निघालेले शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेरूनच परतले, कारण…;”