औरंगाबाद : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, रविंद्र चव्हाण या नेत्यांनी अलिकडे केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यपालांवर देखील मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. यातच मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं असून त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टिका केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ पैठण चा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला. यावेळी त्यांनी भाषणात महापुरूषांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, या देशात शाळा महापुरूषांनी सुरू केल्या आहेत. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, आंबेडकर, यासारख्या महापुरूषांनी शाळा सुरू केल्या. मात्र त्यावेळी त्यांना सरकारकडून कोणतंही अनुदान मिळत नव्हतं. तर त्यांनी भिक मागून शाळा चालवल्या. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
“बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरीता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरूषांचा अपमान करणाऱ्या व महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
“महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसापासून राज्यात या वादग्रस्त वक्तव्यावरूनच राजकीय वातावरण तापलं होतं. त्यातच आता राष्ट्रवादी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
- “पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
- ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
- “मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी
- राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार..! मनसे काय भूमिका घेणार?