पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढत असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतन कर्नाटक बॅंकेत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी सरकारी नोकरदारांना कर्नाटक बॅंकेत जावे लागणार आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. यावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात निर्णय घेताना इडी सरकारला लाज कशी वाटत नाही. ? त्यातच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, याबाबत निर्णय महाविकास आघाडी सरकारने असताना घेतला गेला. पण फडणवीस साहेब येडे आहेत का आपण? का येड्याचे सोंग घेता राव. असं म्हणत महाराष्ट्राचा गंभीर विषय आणि तुम्हाला खोटे आरोप सचतात. असा टोलाही रूपाली पाटील यांनी लगावला.
जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
राज्य सरकारने याबाबत कर्नाटक बॅंकेशी नुकताच करार केला असून अर्थ विभागाने तसा शासन निर्णय आज जाहीर केला. राज्य सरकार 38 विभागांच्या योजनांसाठी सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी बॅंकेत खाते उघडण्याची अनुमती देते. सरकारचे असे खाते त्या त्या विभागाचे आहरण व संवितरण अधिकार चालवतात. तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाच्या नियोजनासाठी बॅंकांना सरकारशी करार करावे लागतात. कर्नाटक बॅंकेने नुकताच राज्य सरकारशी करार केला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाचं पेटला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण यामुळे तापलं आहे. तसेच येत्या 17 तारखेला महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष यासंदर्भात महामोर्चा काढणार आहे.
निर्णय घेताना लाजा नाही ED सरकारला
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला
आणि गृहमंत्री फडवणीस म्हणतात महाविकास आघाडीने निर्णय त्यांचे सरकार असताना निर्णय केला.
फडवणीस साहेब येडे आहेत का आपण? का येड्याचे सौंग घेता राव.
महाराष्ट्राचा गंभीर विषय आणि तुम्हाला खोटे आरोप सुचतात pic.twitter.com/3fPSKAvgGu— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 9, 2022
Read also
- “बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
- “गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
- शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
- प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल