मुंबई : वंचितचे नेते प्रकाश आंबेकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज दुपारी युतीसंदर्भात मुंबईत चर्चा झाली. यावेळी दोन्ही बाजूचे महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते अजित पवार यांच्या बंगल्याकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी येथील बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
“वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
शिवसेना, काॅंग्रेससोबत जाणार पण राष्ट्रवादीत जाणार नसल्याची भूमिका वंचितने घेतली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचा युती संदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांजवळ घेऊन जात आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज देवगिरी येथील बंगल्यावर बैठक होणार आहे. यामध्ये काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.
“कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्याच्या राजकारणात मोठा भुंकप केला होता. त्यातच आता वंचितने उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे. त्यामुळेच आघाडी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य करून वंचितलाही महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेणार का? ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत अजित पवारांसह, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- “खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार
- जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
- “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे
- नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
- “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला