पुणे : मनसेचे पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर खुद्द अजित पवार यांनीच दिली असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेवर नाराज असणारे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. एका लग्नसमांरभात अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
“गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्न समारंभात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी मी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी चर्चा करीत होतो. त्यावेळी अजित दादा माझ्याजवळ आले, अन् मला म्हणाले की, ‘अरे तात्या.., की नाराज, या आता आमच्याकडे’ आम्ही वाट बघतोय. असं अजित पवार म्हणाले असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.
“शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
सध्या, मनसेमध्ये मला डावलण्यात येत आहे. मला टार्गेट केलं जातंय, अनेक मनसेच्या बैठकांना मला बोलवण्यात येत नाही. तसेच स्टेजवर अनेकदा मला भाषण करण्याची परवानगी देखील दिली जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांना देखील सांगितल्या आहेत. तसेच राज ठाकरे यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही, आणि घेतली अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
“मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, पुण्यातील माझं शहाराध्यक्ष पद गेल्यानंतर पक्षाच्या कुठल्याच कोर कमिठीच्या बैठकांना गेलो नाही. तसेच ज्यावेळी अजित पवारांनी मला ऑफर दिली त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक देखील त्याठिकाणी उपस्थित होते. अजित पवारांना मी त्यावेळी फक्त हात जोडले. असंही ते म्हणाले.
Read also
- नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
- “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
- “कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
- ‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर