नागपुर : हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या नागपुर ते शिर्डी या ५२९ किमीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याआधी पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य केले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेली गाडी ही नागपुर येथील एका मोठ्या बिल्डरची असल्याने त्यावर काॅंग्रेसने त्यांच्यावर टिका केली आहे.
नागपुर-मुंबई हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. यातला नागपुर-शिर्डी हा ५२० किमी. मार्ग लोकार्पणासाठी तयार झाला आहे. या मार्गाच्या पाहणीसाठी नागपुर येथून शिर्डी येथे सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहाणी केली. यावेळी फडणवीसांनी नागपुर येथील कुकरेजा यांची गाडी चालविली. त्यावरून महाराष्ट्र आता एका बिल्डरच्या हातात देणार का ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
“गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
त्यावरून भाजपने लगेचच राहुल गांधी यांचा गाडीवरील एक जुना फोटो ट्विट केला. त्यात असं म्हटलं आहे की, ६५ वर्षात काॅंग्रेसला जमलं नाही, ते भाजपने ७ वर्षात पुर्ण केलं. समृद्धी महामार्गावरील ट्रायल काॅंग्रेसला बघवली नाही. बिल्डरची गाडी वापरली म्हणत खोड काढण्याचा प्रयत्न केला. असं म्हणत राहुल गांधी यांनी सहारा ग्रुपची गाडी अनेकदा वापरली असून त्यांनी फक्त जनतेला गंडवलेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
65 वर्षात काँग्रेसला जमलं नाही, ते बीजेपी ने 7 वर्षात पूर्ण केलं. समृद्धी महामार्गावरील ट्रायल काँग्रेसला बघवली नाही. बिल्डरची गाडी वापरली म्हणत खोड काढण्याचा प्रयत्न केला. @INCMaharashtra च्या माहितीसाठी; @RahulGandhi ने जनतेला गंडवलेल्या सहारा ग्रुपची गाडी अनकेदा वापरली आहे. pic.twitter.com/YYG6Dt0Xp7
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 4, 2022
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? pic.twitter.com/2RVJ1Axsog
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 4, 2022
Read also
- “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे
- नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
- “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
- “कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन