पुणे : गुजरातची निवडणुक एकतर्फी होईल यात काही शंका नव्हती. देशाची सत्ता एका राज्यात वापरली गेली. तसेच गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल नाही. अशी प्रतिक्रिया गुजरात विधानसभेच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यावर आता भाजपकडून शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना खोचक टोला हाणला आहे.
जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल होत नाही. पण, गुजरातच्या निकालाने देशाचा मुड स्पष्ट झाला आहे. 2024 ला पुन्हा फिर एकबार मोदी सरकार येणार. तसेच शरद पवार, तुम्ही बारामतीला संपुर्ण महाराष्ट्र समजता त्याचं काय? असा सवाल भाजपने केला आहे. तसेच बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास होत नाही. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
भारतीय जनता पक्षच गुजरातचा विकास करू शकतो. मोदी यांच्या नेतृत्वातच भारत पुढं जावू शकतो हे गुजरातच्या जनतेने दाखवून दिलं. भाजपला 52 टक्के मत मिळाली आहे. तर काॅंग्रेस निच्चांकी 16 जागांवर पुढे आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला, अशा आप पक्षाचे 12 वाजले. जनतेने त्यांना पुर्णपणे नाकारले. तसेच आप पक्ष हा दिल्लीपुरात मर्यादित आहे हे गुजरातने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करतो. मी गुजरातला प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळीच गुजरातचा कल लक्षात आला होता.
नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
दरम्यान, भाजपने गुजरात विधानसभेच्या निवडणुक सगळे विक्रम मोडीत काढत सलग सातवेळा सत्ता काबीज केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 184 पैकी 152 जागा जिंकत काॅंग्रेसला धोपीपछाड केले. तर निव्वळ निवडणुकांची हवा निर्माण करणाऱ्या आपला दोन अंकी संख्या देखील गाठता आली नाही.
Read also
- “महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
- “गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
- शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
- प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
- “खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार