मुंबई : भाजपने गुजरात विधानसभेच्या निवडणुक सगळे विक्रम मोडीत काढत सलग सातवेळा सत्ता काबीज केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 184 पैकी 152 जागा जिंकत काॅंग्रेसला धोपीपछाड केले. तर निव्वळ निवडणुकांची हवा निर्माण करणाऱ्या आपला दोन अंकी संख्या देखील गाठता आली नाही. यातच आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलं आहे.
नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी
गुजराती मनावर मोदींची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता आहे. आजचा गुजरात मी बनवला आहे, हे गुजरात माझे आहे, असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व गुजराती जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री होती व या काळात गुजरातने प्रगती केली. पंतप्रधान म्हणूनही मोदी यांनी गुजरातकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त मोदी यांनाच द्यायला हवे. असं सामानामधून सांगण्यात आलं आहे.
“आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मागच्या विधानसभेच्या निवडणुक काॅंग्रेसच्या निवडणुक आलेल्या आमदारांनी सपाटून मार खाल्ला आहे. यावेळी काॅंग्रेसचे फक्त 16 आमदारच निवडणुक आले आहेत. तर आपला 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे आप पक्षाला आता केंद्रीय निवडणुक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे.
“वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
तर काॅंग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाताहत झाली. काॅंग्रेस किमान पन्नास जागांपर्यत पोहोचेल व पराभवातलही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काॅंग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. तसेच गुजरातमध्ये सर्वात जास्त काॅंग्रेसचे माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखील 149 जागा जिंकल्या होत्या. त्याचा हा विक्रम भाजपने मोडीत काढला आहे.
Read also
- शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
- प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
- “खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार
- जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
- “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे