मुंबई : शिवसेना पक्षावर दाव्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. हे प्रकरण आता निवडणुक आयोगाकडे सोपवण्यात आलं असून दोन्ही गटांना कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना वेळ देखील वाढवून देण्यात आला. यातच आता दोन्ही गटांकडून निवडणुक आयोगाकडे पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी ढिगभर कागदपत्रे जमा केली आहेत.
“आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे अलिकडेच कागदपत्रे दाखल केली होती. परंतु त्यातील काही कागदपत्रे नकली असल्याचा ठपका ठेवत ती कागदपत्रे बाद ठरण्यात आली. त्यातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे आणखी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे.
“वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
काही दिवसांपुर्वी विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला दिले होते. निवडणुक आयोगाने पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कागदपत्रांची मागणी दोन्ही गटांकडे केली होती. पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने 20 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणुक आयोगासमोर सादर केले.
“कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
तर तेवढेच प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल करणार असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आतापर्यंत 10 लाख 30 हजारांच्या घरात सदस्यत्व अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. त्याशिवाय 1.8 लाख पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून आणखी 10 लाख अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Read also
- प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
- “खेड आळंदी मतदार संघात राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा एल्गार
- जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
- “अरे वसंतराव….कधी येणार आमच्याकडे, वाट पाहतोय”; अजित पवारांनीच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली…! वसंत मोरे
- नवनीत राणांनी मारला खणखणीत षटकार..! मैदानावर केली तुफान फटकेबाजी