मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी याचिका दाखल केली आहे. भिडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून गुरूवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तसंच काही आर्थिक गुन्हे शाखेने गौरी भिडे यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार आज त्या हजर होत्या.
“गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा प्रबोधन प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा राजमुद्रा प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रितून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री 2 टोलेजंग इमारती उभी करणं, आलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. असं असतानाम आपलाही हाच व्यवसाय, तेवढेच परिश्रम असल्याने मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल गौरी भिडे यांनी केला आहे.
शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झालेत. तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पर्यावरण मंत्री पद देण्यात आलं.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
उद्धव ठाकरे यांची संपत्ती
उद्धव ठाकरे : १२५ कोटी उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुंबईत 2 बंगले आहेत. याशिवाय कर्जत येथे फार्महाऊस, विविध शेअर्स रश्मी ठाकरे ३४ लाख ८६ हजार ५५९ कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. शेअर्समधून मिळणारा डिव्हिडंड हे उत्पन्न असून त्यांची एकूण संपत्ती १२५ कोटी आहे.
आदित्य ठाकरे यांची संपत्ती बँक ठेवी – १० कोटी ३६ लाख रुपये बाँड शेअर्स – २० लाख ३९ हजार रुपये वाहन – बीएमडब्ल्यू किंमत ६ लाख ५० हजार रुपये दागिने – ६४ लाख ६५ हजार इतर १० लाख २२ हजार एकूण – ११ कोटी ३८ लाख दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे ४४ लाख रुपये.
विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरतानाचे विवरण उद्धव ठाकरे- ७६ कोटी ५९ लाख ५७ हजार ५७७ रश्मी ठाकरे संपत्ती- ६५ कोटी ०९ लाख ०२ हजार ७९१ , बैंक डिपॉझिट्स उद्धव ठाकरे – १ कोटी ६० लाख ९३ हजार ६७५ रश्मी ठाकरे – ३४ लाख ८६ हजार ५५९
हिंदू अविभक्त कुटुंब – ५६ लाख २१ हजार ४३९ , शेअर्स उद्धव ठाकरे – २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १ रश्मी ठाकरे – ३३ कोटी ७९ लाख ६२ हजार ४६० , सोने, दागिने उद्धव ठाकरे – २३ लाख २० हजार ७३६ रश्मी ठाकरे – १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९
मिळकत/व्याज उद्धव ठाकरे ५८ लाख ५७ हजार २५९ रश्मी ठाकरे ५६ लाख १७ हजार ७१६ स्थावर मालमत्ता (जमिनीची किंमत) उद्धव ठाकरे – ५२ कोटी ४४ लाख ५७ हजार ९८४ रश्मी ठाकरे २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६ , कर्ज : उद्धव ठाकरे – ४ कोटी ०६ लाख ०३ हजार ६२४ रश्मी ठाकरे- ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९
Read also
- “मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी
- राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार..! मनसे काय भूमिका घेणार?
- “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता कर्नाटक बॅंकेत”, शिंदे-फडणवीसांचा निर्णय, राष्ट्रवादीची जहरी टिका
- “बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”