पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेसंदर्भात वाद निर्माण झाला. त्यावर आता ही स्पर्धा पुण्यातच होणार असून पुण्याचे माजी महापौर मुरलधिर मोहोळ यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर स्पर्धा पुण्यातच होण्यासाठी पत्र दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतल्या वादावर खासदार बृजभुषण सिंह यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून ते 15 जानेवारीला पुण्यात येण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने सुरूवातीला ही स्पर्धा पुण्यात होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा यामध्ये वाद निर्माण झाल्याने ही स्पर्धा 25 ते 31 डिसेंबर या दरम्यान वाडिया पार्क मैदानात खेळविली जाणार असल्याचं घोषित केलं. मात्र त्यानंतर परिषदेने पुण्यातच घेण्याचं ठरविलं.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मिटवताना भाजपचे खासदार रामदास तडस यांना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आलं. तर शरद पवार या परिषदेचे चीफ पेट्रेन अर्थाच मुख्य आश्रयदाते तर बाळासाहेब लांडगे पेर्ट्रेन असणार आहेत. ही स्पर्धा पुण्यात आता 11 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्याचं ठरविलं आलं. तर 15 जानेवारीला होणाऱ्या अंतिम लढतीसाठी येण्याचं आमंत्रण बृजभूषण सिंह यांना देण्यात आलं असून त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आहे.
जशाचं तसं उत्तर..! फडणवीसांनी बिल्डरची गाडी चालवली, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा तो जुना फोटो
दरम्यान, जुलै महिन्यात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभुषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांना आयोध्या दौरा स्थगित करावा लागला. त्यामुळे बृजभूषण सिंह पुण्यात येणार असून मनसे काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता कर्नाटक बॅंकेत”, शिंदे-फडणवीसांचा निर्णय, राष्ट्रवादीची जहरी टिका
- “बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
- “गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक
- शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र