पुणे : राज्यात मागील काही महिन्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. महात्मा फुले, सावित्री फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर सातत्याने टिका केली जात आहे. यातच पुण्यातील एका कार्यक्रमात मी स्वत: ला राज्यपाल मानतच नाही, असं मिश्किल वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
शिवसेनेसाठी ठाकरे-शिंदेंमध्ये आरपारची लढाई..! निवडणुक आयोगासमोर जमा केले ढिगभर प्रतिज्ञापत्र
राज्यपाल भगतसिंह कोशयारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलण्यास उभे राहिले. त्यात सभागृहातील एक महिला राज्यपालांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. राज्यपाल तुम्ही आम्हाला दिसतच नाही. असा सवाल केल्यानंतर मी स्वत:ला राज्यपाल मानतच नाही. अशी मिश्किल टिप्पणी केली.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकीत दाखल
मात्र त्या महिलेच्या तक्रारीनंतर छात्राचित्रकारांना राज्यपालांनी बाजूला सरकण्याचे आदेश दिले. छायाचित्रकार बाजूला झाल्यानंतर राज्यपाल म्हणाले की, मी स्वत: ला राज्यपाल मानत नाही. यानंतर सभागृहात एकच हश्या पिकला. त्यावेळी सभागृहातील प्रत्येकाला राज्यातील मागील घटनांची आठवण झाली.
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हाकलून लावा, अशी मागणी देखील केली जात आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also
- राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार..! मनसे काय भूमिका घेणार?
- “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता कर्नाटक बॅंकेत”, शिंदे-फडणवीसांचा निर्णय, राष्ट्रवादीची जहरी टिका
- “बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्राची अस्मिता चिरडली जात असतानाही सर्वपक्षीय खासदार एकत्र येत नाहीत हे दुर्दैव”
- “गुजराती मनावर मोदींची मोहिनी, हीच गुजरातची अस्मिता”; सामनातुन मोदींचं कौतुक