नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या चांगलाचं तापंल असून यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टिकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात राज्यातील विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेत देखील यावर चर्चा केली. परंतु खासदार अमोल कोल्हे यांचा यावेळी माईक बंद करण्यात आला. अशातच आज महाविकास आघाडीतील खासदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. मात्र यावेळी शिंदे गटातील खासदार देखील अमित शहा यांची भेट घेण्यास निघाले असता. ठाकरे गटातील खासदारांनी आक्षेप घेतल्याने ते खासदार दारातूनच परतले.
राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार..! मनसे काय भूमिका घेणार?
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत करीत असलेली वक्तव्ये व त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेवर सुरू झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेनेचे खासदार, अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी, तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे तसेच काॅंग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर उपस्थित होते.
यावेळी अमित शहा यांच्या भेटीला जाताना सीमावादावर एकीचं दर्शन घडवणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न फोल ठरला. शिंदे गटाच्या खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन केल्यानंतर धैर्यशील माने, श्रीरंग बारणे सोबत यायला निघाले पण ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप घेतल्याने दालनाबाहेरूनच ते परतले असल्याची माहिती समोर येत आहे.
“बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास नाही”; भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत करीत असलेली वक्तव्ये व त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेवर सुरु झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री मा. अमितजी शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान अमितजी शाह यांनी आमची भूमिका शांतपणे ऐकून घेतली. ही बैठक अतिशय सकारात्मक झाली. भेटीसाठी वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल अमितजी शाह यांचे मनापासून आभार. असं ट्विट त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
Read also
- राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
- “आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
- “पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
- ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
- “मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी