पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धा पुण्यात 11 ते 15 जानेवारी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत अनेक वाद निर्माण झाला होता. सुरूवातीला पुण्यात, त्यानंतर नगर आणि परत ही स्पर्धा आता पुण्यात घेण्याचं ठरविलं आहे. यासंदर्भात भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राज्यातील अनेक नेत्यांना देखील यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
“आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 15 तारखेला बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता मनसेकडून त्यांना विरोध होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होतो.
“पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
त्यावर आता बृजभूषण सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसे मला विरोध करणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. यासाठी मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. राज ठाकरेंना मी नैतिकरित्या विरोध केला होता. राज ठाकरे यांना मी फक्त माफी मागा, असं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या जागी मी असतो आणि माझ्याकडून काही चूक झाली असती, तर मी नक्कीच माफी मागितली असती. असं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील पैलवान यांच्यासोबत कोणताही भेदभाव करत नाही. मी महाराष्ट्रातील पैलवानांवर माझं प्रेम आहे, असंही ते म्हणाले.
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेसंदर्भात वाद निर्माण झाला. त्यावर आता ही स्पर्धा पुण्यातच होणार असून पुण्याचे माजी महापौर मुरलधिर मोहोळ यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर स्पर्धा पुण्यातच होण्यासाठी पत्र दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतल्या वादावर खासदार बृजभुषण सिंह यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून ते 15 जानेवारीला पुण्यात येण्याची शक्यता आहे.
Read also
- “उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवलंय”; शिवसेनेच्या नेत्याची टिका
- “यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
- “महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
- “अमित शहांची भेट घ्यायला निघालेले शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेरूनच परतले, कारण…;”
- राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य