पुणे : महापुरूषांना त्यावेळी अनुदान वगैरे काही मिळत नव्हतं. त्यावेळी त्यांनी लोकांकडून भीक मागून शाळा चालविल्या. असे वक्तव्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ पैठण चा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला. यावेळी त्यांनी भाषणात महापुरूषांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांवर जहरी टिका केली आहे.
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
भीक आणि त्याग-मेहनत यातला फरक समजून न घेता फुले-आंबेडकरांनी समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानावर भिकेचा शिक्का मारत त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चंद्रकांत दादांनी केलाय. पण यामुळे महत्त्व कमी होणार नाहीच, पण असं बोलून त्यांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं! समाजातील मूलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष करण्यासाठी सातत्याने राज्यातील थोर व्यक्तीबाबत भाजपचे लोक कुत्सितपणे बोलत असतील तर ते युवांच्या भवितव्याचं वाटोळं आणि बौद्धिक नुकसानही करत आहेत, याचा सर्वांनीच विचार करायला हवा. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टिका केली आहे.
“मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी
तर आपण जर चांगले काम करत असतो तेव्हा, आपण लोकांकडे जातो, मदत मागतो, तेव्हा लोकं आपल्या सढळ हाताने मदत करतात. चंद्रकांत पाटलांनी वापरलेला भीका हा शब्द योग्य आहे का ? असा सवाल करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाटलांचा समाचार घेतला आहे. कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांची रयत शिक्षण संस्था ही शेतकऱ्यांच्या कष्टावर उभी राहणारी संस्था आहे. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
Read also
- “महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
- “अमित शहांची भेट घ्यायला निघालेले शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेरूनच परतले, कारण…;”
- राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
- “आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका
- “पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”