मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ पैठणचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला. यावेळी त्यांनी भाषणात महापुरूषांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, या देशात शाळा महापुरूषांनी सुरू केल्या आहेत. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, आंबेडकर, यासारख्या महापुरूषांनी शाळा सुरू केल्या. मात्र त्यावेळी त्यांना सरकारकडून कोणतंही अनुदान मिळत नव्हतं. तर त्यांनी भिक मागून शाळा चालवल्या. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावरून राज्यात विरोधी पक्षांनी चंद्रकांत पाटलांवर टिकास्त्र सोडलं आहे.
“पवारसाहेब स्वतः तिकडे येतो, बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली”
उठ- सुठ महापुरूषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळांसाठी लोकांकडे भीक मागितली अशी भिकार भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना काय म्हणावे? ती लोकवर्गणी होती. शिक्षणासाठी पैसा नसेल तर सरकारने भीक मागावी, अशी टिका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी टिका केली आहे.
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी..!उद्धव ठाकरेंकडे 125 कोटी, तर आदित्य ठाकरेंची 11 कोटी संपत्ती
भीक आणि त्याग-मेहनत यातला फरक समजून न घेता फुले-आंबेडकरांनी समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानावर भिकेचा शिक्का मारत त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चंद्रकांत दादांनी केलाय. पण यामुळे महत्त्व कमी होणार नाहीच, पण असं बोलून त्यांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं! समाजातील मूलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष करण्यासाठी सातत्याने राज्यातील थोर व्यक्तीबाबत भाजपचे लोक कुत्सितपणे बोलत असतील तर ते युवांच्या भवितव्याचं वाटोळं आणि बौद्धिक नुकसानही करत आहेत, याचा सर्वांनीच विचार करायला हवा. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टिका केली आहे.
“मी स्वत:ला राज्यपालचं मानत नाही;” पुण्यात कोश्यारींची मिश्किल टिप्पणी
दरम्यान, भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरीता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरूषांचा अपमान करणाऱ्या व महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
उठ-सूठ महापुरुषांच्या अवमानाचे भाजपने धोरणचं ठरवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळांसाठी लोकांकडे भीक मागितली अशी भिकार भाषा वापरणाऱ्या @ChDadaPatil यांना काय म्हणावे?
ती लोकवर्गणी होती.— Dr.ManishaKayande (@KayandeDr) December 9, 2022
Read also
- “यामधून चंद्रकांत पाटलांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं”; रोहित पवारांची जहरी टिका
- “महापुरूषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध”;अन् मिटकरी संतापले
- “अमित शहांची भेट घ्यायला निघालेले शिंदे गटाचे खासदार दालनाबाहेरूनच परतले, कारण…;”
- राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
- “आपल्या माणसांना मारलं जातंय, तरीही आपण एकत्र नाहीत”; राष्ट्रवादीची भाजप-शिंदेंवर टिका