अहमदनगर : गेली अनेक वर्षे अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं खोळंबली आहेत. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामांसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.
शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
आज आमदार निलेश लंके यांची विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही प्रलंबित कामं पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागानं लेखी आश्वासन दिलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही खात्री दिली आहे. त्यामुळे निलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. या कामांबाबत आपणही पाठपुरावा करु आणि भविष्यात या कामांसाठी आंदोलन करण्याची वेळ भासणार नाही यासाठी प्रयत्न करु असे अजित पवार म्हणाले.
“पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव” ; सुप्रिया सुळे
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके उपोषणाला बसले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मध्यंतरी निलेश लंके यांची भेट घेऊन विचारपुर केली. अलिकडेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देखील निलेश लंके यांची भेट घेतली होती.
Read also
- “राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
- “अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार
- विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक लांबणीवर..! 21 जागा ही झाल्या रिक्त
- फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
- “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला