जालना : राज्यात मागील काही दिवसापासून मंत्री महिलांचा अपमान करीत आहेत. आपण महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतो अन् इथे सर्रासपणे महिलांचा अपमान केला जातो. मध्यंतरी महिलांचा अपमान केलेल्या मंत्र्याला अजूनही मंत्रिमंडळात स्थान आहे. मी असतो तर काढून टाकलं असतं. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. आज ४२ व्या मराठवाडा (घनसावंगी) साहित्य समेंलन होत आहे. त्यावेळी ते उद्घाटनाप्रसंगी भाषणात बोलत होते.
“उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी अगोदर प्राथमिक शिक्षण घ्यावे”; चाकणकरांचा खोचक सल्ला
अलिकडेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. खोक्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सुळेंवर जहरी टिका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी होणार का ?
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुजा चव्हाण प्रकरणात आरोपी असलेले शिवसेनेचे आमदार आणि संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची हाकालपट्टी केली होती. त्याच पद्धतीने अब्दुल सत्तार यांची देखील मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Read also
- “लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”
- “राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
- “अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार
- विधानपरिषद सभापतीपदाची निवडणुक लांबणीवर..! 21 जागा ही झाल्या रिक्त
- फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची नरेंद्र मोदींनी घेतली दखल…! एकनाथ शिंदेंनी दिली माहिती