पिंपरी चिंचवड : महापुरूषांनी भीक मागून शाळा चालवल्या असल्याचं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जहरी टिका करत निषेध व्यक्त केला. विधानसभेचा कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादीने आंदोलन देखील केलं होतं. मात्र याचत पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाच्या वेळी एका व्यक्तीने चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याने तो हा वाद आणखी चिघळला आहे.
“राजकारण हे वाईट नाही, तरुण तरुणींनी राजकारणात यावं”; उद्धव ठाकरेंचं आवाहन
महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून टिका झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र आज पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना चंद्रकांत पाटलांवर एका व्यक्तीने शाई फेक केली आहे. त्यानंतर तात्काळ शाई फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
“अरे काय गोपीचंदा… तुला काही कळतं का ?” अजित पवारांनी पडळकरांचा घेतला समाचार
एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड मध्ये आले होते. या कार्यक्रमाला समता परिषदेने कार्यक्रमाच्या वेळी जोरदार निर्देशने केली होती. यातच समता परिषदेच्याच व्यक्तींनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याची माहिती समोर येत आहे. आता या व्यक्तीचा इतर राजकीय पक्षाशी संबंध आहेत का ? याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
Read also
- पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- “मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी
- नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
- “महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा”; उद्धव ठाकरेंची मागणी
- “लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”