नागपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे. त्यासाठी आज मोदी यांचं नागपुर येथे भव्य स्वागत करण्यात आलेय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. वायफळ टोलनाक्यावर नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करण्या आलं. त्यावेळी मोदींनी ढोलताशा देखील वाजवला.
नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झिरो माईल ते वायफळ टोलनाक्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गावरून मोदींनी प्रवास केला. यावेळी त्यांचं वायफळ टोलनाक्याजवळ ढोल पथकांनी नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. आणि त्यांनी थेट ढोल पथकामध्ये जाऊन ढोल वाजवला. यावेळी ढोलवादक पथकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
“महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा”; उद्धव ठाकरेंची मागणी
समृद्धी महामार्गावर् भगवे झेंडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआहट लावण्यात आले आहे. महामार्गाच्या दुभाजकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छात्रचित्रे असलेले होर्डिंग्ज लागले आहेत. तसेच नरेंद्र मोदी वायफळ टोलनाक्याकडे गेले. त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास केला.
“लंकेंच्या उपोषणाच्या स्थळी अजित पवारांची हजेरी, रस्त्यांची कामे मार्गी लागणार ?”
दरम्यान, याआधी त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यानंतर त्यांनी मेट्रो फेज 2 चं भूमिपुजन केले. तसेच त्यांनी मेट्रो मधून प्रवास करत शाळकरी मुलांसोबत देखील त्यांनी मेट्रोनी प्रवास केला आहे. एकुण 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचबरोबर विविध विकासकामाचं लोकार्पण करण्यात आलं.
Read also
- नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
- “महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
- चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
- पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- “मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी