नागपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार आणि राज्यपाल उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग पुर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानले.
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
समृद्धी महामार्गाला आम्ही आमचं दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आम्ही दिलंय, आणि त्यांच्या मनात सरकारप्रती विश्वास संपादन केला. त्या विश्वासातूनच हा ऐतिहासीक महामार्ग आता उभा राहीला आहे. या महामार्गाचं आज लोकार्पण केलं जातंय. सारे प्रकल्पाचे लाभार्थी ठरले. या महामार्गाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अनेकांनी विरोध केला. तर, काहींनी राजकारण केले. अनेक ठिकाणी आंदोलनं सुध्दा झाली. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेल. असं मुख्यमंत्री एकनात शिंदे म्हणाले.
“मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी
या महामार्गासाठी भूसंपादनही आम्ही विक्रमी वेळेत केलं. त्यासाठी भूसंपादन या कायद्यात सुधारणा केली. पाच पट मोबदला आणि तोही ताबडतोब. पैसे थेट खात्यात जमा केले. त्यामुळे या प्रकल्पात कोणीही प्रकल्पग्रस्त राहिला नाही. पर्यावरणाचे संवर्धन करत हा महामार्ग उभा राहिला आहे. संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ११ लाखांपेक्षा अधिक झाडं लावण्याचं नियोजन केलं आहे, वन्य प्राण्यांसाठी आम्ही स्वतंत्र कॉरिडोर केले. रस्त्यांच्या कामात वन्य प्राण्यांच्या अधिवासाला जपण्याचा असा ठोस प्रयत्न आजवर कुठे झालेला नाही. असंही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
हा समृद्धीचा महामार्ग आहे आणि ही समृद्धी आहे ती महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची आहे पहिल्या टप्प्यात हा रस्ता नागपूरपासून शिर्डीपर्यंतच झालेला आहे. मुंबई पर्यंतचा पुढचा टप्पाही लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर हा महामार्ग आपण नांदेड आणि गडचिरोलीपर्यंत हा मार्ग आपण घेऊ चाललो आहोत. त्यामुळं छत्तीसगड आणि तेलंगणा ही दोन राज्यं देखील जोडली जाणार आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
- “मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
- नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
- “महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
- चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ