बुलढाणा : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर पावसाळी अधिवेशनात त्यानंतर विरोधकांनी बंडखोर आमदारांवर 50 खोक्यांचा आरोप लावला. त्याच कालावधीत पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा प्रचलित झाली. मग त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रत्येक सभेतून बंडखोरांवर खोक्यांचा आरोप करत जाहीर टिका केली. यातच आता ठाकरे गटातील एका नेत्यांने बंडखोर आमदारांचं कौतुक केलं आहे.
“महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी करत शिवसेनेच्या 40 तर अपक्ष 10 आमदारांना घेऊन त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे. मंत्रीपदासाठी बच्चू कडू आग्रही होते. परंतु त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले नाही. परंतु त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला ते दिव्यांग मंत्रालयाला शिंदे सरकारने परवानगी दिली. याचंचं कौतुक विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
बच्चू कडू यांचं मी जाहीर अभिनंदन करतो. त्यांना खोके मिळाले, नाही मिळाले हे मला माहिती नाही. मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पण कडू हे माझे चांगले मित्र आहे. राज्यातील सत्तांतरानंतर किमान त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वंतत्र मंत्रालय हवं अशी अनेक वर्षांची जी मागणी होती. ती मंजूर करून घेतली. असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
दरम्यान, चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. तुमच्या विदर्भातले एक नेते ज्यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं. पण त्यांना ते पचलं नाही. समोर ताट वाढलेलं होतं. पण ते पचवता आलं नाही. आता फिरतायेत सगळीकडे असं म्हणत त्यांनी कडूंवर टिका केली होती.
Read also
- “मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”
- “भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे
- “मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
- “मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
- नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण