जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला भाजप- शिंदे पॅनेल हरवलं आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनात खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामाना करावा लागला आहे.
“मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ ख़डसे म्हणाले की, विरोधी पक्षांकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे. असंही एकनाथ खडसे म्हणाले.
नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, नव्यानं निवडून आलेल्या संचालकांनी चांगलं काम करून दाखवावं ही अपेक्षा आहे. ही निवडणुक लागली असताना तिला ब्रेक दिला गेला, नंतर पुन्हा निवडणूक जाहीर केली, असं राज्यात पहिल्यांदाच घडलं आहे. या निमित्तानं आम्हाला गाफील ठेवण्यात आलं आहे. या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ अशी परिस्थिती होती. आम्ही सत्तेवर असताना चांगल्या प्रकारे आणि पारदर्शी पणानं संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. असंही ते म्हणाले.
“महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
या निवडणुकूत आमचा पराभव झाला असला तरी कमी मताच्या फरकानं अनेक जागा गेल्या आहेत. आमच्या विरोधात दोन सत्ताधारी मंत्री, दोन खासदार, आमदार एवढे जण होते. त्याचाही विचार केला गेला पाहिजे, असंही ते म्हणाले.
Read also
- “बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
- 50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक
- “मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”
- “भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे
- “मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस