अहमदनगर : डॅशींग अधिकारी म्हणून ओळख असलेले आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीच तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता तेथूनही त्यांची बदली करण्यात आली आहे. 16 वर्षाच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची 15 पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली आहे. मात्र यावेळी बदली होण्यामागे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं नाव घेतलं जात आहे.
“मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अचानक बदली होण्यामागे खुद्द आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. समज देऊनही मुंढे यांच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. उलटपक्षी आरोग्य विभागाची व पर्यायाने सरकारची प्रतिमा मलिन करण्याची त्यांची वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी केली होती.
“मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सुचना देण्यात आल्या होत्या.
Read also
- शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”
- “बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
- 50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक
- “मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”
- “भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे