पुणे : महापरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्या केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली. यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी यानंतर राष्ट्रवादीवर जहरी टिका करत अजित पवारांना याबाबत भाष्य करण्यास जाहीर आवाहन केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर चांगलाचं टोला हाणला आहे.
“भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे
चंद्रकांत दादा पाटील यांची चिडचीड पाहता मानसिक स्थिरता येण्यासाठी विपश्यना करण्याची गरज वाटत आहे. असं म्हणत सुरज चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर चंद्रकांत पाटलांच्या आव्हाना नंतरही 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
“मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
तर आज कालच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कटात सामील झाल्याचा ठपका ठेऊन पत्रकारांना अटक केली आहे. यावरून पोलीस निलंबित, पत्रकारांना अटक, अन् वाचाळवीर नेत्यांची जीभ मात्र मोकाट अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
“मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उग्र निदर्शने करण्याचे आदेश दिले आहेत.
Read also
- कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
- शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”
- “बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
- 50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक
- “मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”