जळगाव : जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत शिंदे-भाजपच्या पॅनेलने विजय मिळवत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा पराभाव केला आहे. यातच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत नोकर भरतीचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर लावला आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हा वाद पुन्हा एकदा राज्यात गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी खडसेंवर हा आरोप लावला आहे. जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत नोकर भरतीचा घोटाळा हा खडसेंच्या संचालक मंडळाच्या काळात झाला. आता याठिकाणी आमची सत्ता आली असून दुध का दुध,पानी, का पानी होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ ख़डसे म्हणाले की, विरोधी पक्षांकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे. असंही एकनाथ खडसे म्हणाले.
Read also
- “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
- “शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
- “१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
- नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला