मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, पण मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं. तसेच मोदींच्या बोलण्यावरून पवारांचं राजकारणातील स्थान किती मोठं आहे, हे दिसून येतं. तसेच शरद पवार यांनी आपल्या सर्वांना राजकारणातील सुसंस्कृतपणा शिकवला. अशी भावना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
नरेंद्र मोदी देखील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर करण्याच्या यादीच मी देखील असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं. त्यांचंच बोट धरून राजकारणात चालायला शिकलो. ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्विकारण्यात मला अभिमान वाटतो. अशा पद्धतीने जरी आपलं सर्वांचं राजकीय मतांतरे, विचार, पक्ष वेगळा असू शकतो, परंतु त्याच्यामध्येही पंतप्रधानांचं मोठेपणा आणि शरद पवारांचा मान हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं अजित पवार यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
काळ वेळ कुणासाठी थांबत नसतो. तो नेहमी पुढे जात असतो. परंतु त्यामध्ये आपल्याला बरंच काही करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तींनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. तसेच ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा परिषद, नगपालिका, नगरपरिषदा, महापालिका, त्यानंतर आमदार, खासदारकी यामध्ये राष्ट्रवादी विचारांचे माणसं कशी जास्तीत जास्त निवडून येतील त्यासाठी प्रयत्न करणे गरजे असल्याचंही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
Read also
- “नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं
- खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
- “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
- “शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
- “१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”