सिंधुदुर्ग : नितेश राणे यांच्या धमकीला भीक घालू नका, असं म्हणत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. सिंधुदुर्ग येथील एका ग्रामसभेत नितेश राणे यांनी गावकऱ्यांना मत देण्यासंदर्धात धमकी दिली होती. त्यावरून विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर जहरी टिका करत चांगलचं फटकारलं आहे.
नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
नितेश राणे यांनी नांदगाव येथील गावकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीवरून धमकी दिली आहे. ते म्हणाले की, येथून पुढे जर माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर एकही रूपयाचा निधी देणार नाही. आता याला तुम्ही धमकी समजा, किंवा अन्य काही. पण निधी वाटप करण्याचा निर्णय माझ्या हातात आहे. हे लक्षात ठेवा. मंत्री असो, पालकमंत्री असो, आमदार असो, किंवा अन्य कोणी हे मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये कोणताही निधी देणार नाही. असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”
त्यावर आता विनायक राऊतांनी टिका केली आहे. नितेश राणे आणि त्यांची पिलावळ ह्यांचा जन्मच खुनशी वृत्तीनी झाला आहे. कामाच्या जोरावर मत मागण्याऐवजी धमकी देऊन मत मागितली जात असतील तर सिंधुदुर्गवासियांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. खासदार म्हणून मी आहेच परंतु शिवसेनेसह इतर पक्ष देखील तुमच्यापाठीशी आहोत. त्यामुळे नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका. असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी आता राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.
Read also
- खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
- “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
- “शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
- “१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर