मुंबई : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ पुणे असून त्याठिकाणी पुणे बंदची हाक दिली आहे. जर पुण्यामध्ये आज कडकडीत बंद सुरू असेल तर हे बंद पुढे संपुर्ण महाराष्ट्रात याचे लोण पसरेल अन् संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल, अशी शक्यता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. आज राज्यपालांविरोधात सर्वपक्षीय नेत्यांकडून पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये भाजपचे खासदार उदयन राजे यांनी देखील सहभाग घेतला आहे.
“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर, तर बारामतीतून 51 हजारांचे बक्षीस”
आज पुणे बंदची दखल, केंद्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांनी घ्यायला हवी. तुम्ही लिहिलेल्या पत्राचा परिणाम झाला नाही. हे पुणेकर दाखवून देत आहेत, आणि बंद चं लोण पसरत गेलं तर संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच १७ तारखेला जो मोर्चा होत आहे. हा त्याच कारणांसाठी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेऊन आयत्या बिळावर नागोबाची भूमिका घेतली”; भाजपचा घणाघात
तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट झाल्याची माहिती येत आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ते दोन्ही मुख्यमंत्री रस्त्यावर भेटले असल्याची माहिती आहे. ही काय रस्त्यावर भेटून सीमावादावर चर्चा करण्याची जागा आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. असं रस्त्यावर भेटलो असे लोकांना सांगू नये. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मागील ६० वर्षापासून माणसं यासाठी लढाताहेत. मान अपमान सहन करताहेत. ते दोन मिनिटांत आटोपताहेत. असा खोचक सवालही त्यांनी केला.
“प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणा”; अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, डेक्कन येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा अलका टॉकीज, लक्ष्मी रोडवरून पुढे लाल महाल याठिकाणी जाणार आहेत. या मोर्चात राजकीय संघटना, व्यापारी संघटना, तसेच पुण्यातील सर्वच संघटनांसोबत 40 मुस्लिम संघटनांही यामध्ये सहभाग घेतला आहे. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
Read also
- मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन
- पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
- पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
- शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव