पुणे : सरकार पाडण्याबाबत केलेल्या वक्तव्यवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता युटर्न घेतले आहे ,एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलो नाही. या मुलाखतीचा व्हिडfओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.’
“चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, एवढंच माझं वाक्य आहे. शेवटी मी कुटुंबप्रमुख आहे. आम्ही पोलीसवाले संपूर्ण कुटुंब म्हणून काम करतो.” असं देशमुख म्हणाले.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा खुलासा केला होता. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे ते म्हणाले आहेत.