मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. लोकायुक्तांनी त्यांनी वांद्रे पूर्व येथे म्हॉडा कॉलनीत असलेलं अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश दिले आहेत. लोकायुक्त व्ही.एम. कानडे यांनी हे आदेश दिले आहेत. तसंच हे कार्यालय तोडल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये अहवाल सादर करावा, असंही लोकायुक्तांनी सांगितलं आहे.
चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय, हवेत गोळीबार करू नका – संजय राऊत
लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. लोकायुक्तांपुढे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याचिका सादर केली होती. त्यानंतर त्या याचिकेवर गेल्या महिन्यात सुनावण्या पार पडल्या. अनिल परब यांचे कार्यालय म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारी 2019 ला विलास शेगले यांनी या बांधकामविरोधात म्हाडाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मिळकत व्यवस्थापकांकडून अनिल परब यांनी 27 जून आणि 22 जुलै 2019 ला दोन वेळा नोटीस बजावली होती. या नोटीशीमध्ये परब यांना बांधकाम तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. किंवा म्हाडाकडूनही काही कारवाई करण्यात आली नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
सध्या अनिल परब हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंत्र्यांच्या दबावामुळे हे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं नसल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज्यपालांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे चौकशीसाठी पाठवलं. त्यानंतर चौकशी केल्यानंतर गृहनिर्माण सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीमध्ये हे बांधकाम अनधिकृत असल्याचं मान्य केलं.
Read Also :
- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी : OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेसच्या आमदाराकडून छळ; पी. एन. पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल
- राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार – प्रविण दरेकर