मुंबई : ठाकरे सरकाराच्या मंत्र्यांची पोलखोल करणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असताना, शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता येत्या सोमवारी महाविकास आघाडी सरकरमधल्या कोणत्या दोन नेत्यांचे भ्रष्टाचार उघड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. ते दोन नेते कोण? यावर देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच बाप्पा चरणी प्रार्थना – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आज सांगितले की, ‘माझ्याकडे दोन मोठे गठ्ठे आहेत. ज्याच्या पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा आणि दुसऱ्या चार हजार पानांच्या गठ्ठयात शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळा आहे. मी याबाबत फडणवीस यांच्याशी बोललो असून, ते दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे, मी सोमवारी नावे उघड करणार आहे.’
अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
तसेच, ‘तुम्ही चांगलं काम करत आहात . त्यामुळे, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची, असं फडणवीसांनी मला सांगितलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची कोर्टाने नुकतीच मुक्तता केली. त्या पार्श्वभूमीवर बोलताना, ‘एखादा कुठला निकाल आला की काही मंत्र्यांना ‘चार दिन की चांदनी’ असं वाटतं. त्यांना ५- १५ दिवस शेरोशायरी करू द्या. त्यांना एवढेच सांगणे आहे की उड्या मारू नका.”
भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
दरम्यान, पुण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी, साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिम्मत अजित पवार का दाखवत नाहीत? असा सवाल केला. जितेंद्र आव्हाड या बाराव्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्याबाबतचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, ‘शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करते. शरद पवार आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करताय का?’ असा थेट सवाल देखील त्यांनी केला.
Read Also :