पिंपरी चिंचवड : आगामी महापालिका निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली असताना पिंपरी चिंचवडमधील भाजपला गळती लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बारणे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकेला. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडकरांचा कौल कोणाकडे झुकणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, याअगोदर भाजपच्या काही दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात बलात्काराचा प्रयत्न; ताईगिरी करणाऱ्या चित्रा वाघ आता कुठे आहेत?
संभाजी बारणेच्या पक्षप्रवेशावेळी पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते. चिंचवमधील थेरगाव परिसरातून संभाजी बारणे यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली आहे. अवघ्या ४०० मतांच्या फरकाने बारणे यांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता. पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्यपदी बारणे यांनी काम केले आहे.
किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
याबाबत अभय मांढरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारभाराला कंटाळून अनेकजन राष्ट्रवादीत येणार आहेत. अद्याप ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तसेच, सभागृहातील बडा नेता अजितदादांच्या संपर्कात असून, लवकरच प्रवेश होईल, असा दावाही मांढरे यांनी केला आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?
- लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
- अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, मी नरीमन पॉईंट दिल्लीला जोडतो – नितीन गडकरी
- छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला; 500 पुरावे घेवून शिवसेना आमदाराची कोर्टात धाव
- ‘तुमची धोतरं पेटतील’ म्हणणाऱ्या शिवसेनेचं राज्यपालासमोर लोटांगण: 24 तासातच राऊतांनी मारली पलटी