मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेकडे मोर्चा वळवला आहे. आज सकाळीच शिवसेनेचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेके स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विचार भागाने धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यात आता राजकीय नेत्यांमध्ये एकच धाकधूक निर्माण झाली आहे.
मुसलमानाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही का? नवाब मलिकांच्या मुलीचा सवाल
सुरुवातीला असा संभ्रम निर्माण करण्यात आला की यशवंत जाधव यांच्या घरी इडीनेच छापा टाकला. परंतु नंतर इडीच्या अधिकाऱ्यांकडून या माहितीला दुजोरा दिला. आयकर विभागाचे पथक सकाळीच जाधव यांच्या घरी दाखल झाले. त्यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ती रक्कम त्यांनी युईला हलवल्याचं सांगण्यात येत आहे.
ईडीपासून काळजी घ्या, एवढा अहंकार बरा नव्हे; राजू शेट्टींचा अजित पवारांना गंभीर इशारा
भाजप नेत्यांकडून जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर सकाळीच सीआरएफ जवानांसह आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणा शिवसेनेच्या नेत्यांच्या रडारवर आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Read also:
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
- आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
- उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;
- किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर