अलिबाग : राज्यात नवाब मलिक प्रकरण गाजत असतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय, उद्योजक प्रवीण राऊत यांच्या संबंधित दोघा जणांवर इडीने छापे टाकले आहेत. यांनी बेनामी जमिनी खरेदी केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.
रशिया युक्रेन युद्धाचे विचलित करणारे दृश्य; सोशल मीडियावर व्हायरल
गोरेगाव येथील भूखंडाच्या विक्रीमध्ये एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली प्रवीण राऊत यांना ईडीने २ फेब्रुवारी रोजी अटक केली. या प्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. प्रवीण राऊत यांनी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी ईडीने प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांची चौकशी केली.
मुसलमानाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही का? नवाब मलिकांच्या मुलीचा सवाल
ठाणे आणि रायगडमध्ये या कारवाईसाठी दिल्लीतील तब्बल २५ ते ३० ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी ठाणे आणि रायगडमध्ये दाखल झाले. पर्लग्रुप नावाच्या कंपनीने लोकांचे कोट्यवधी रूपये बुडवल्यानंतर सेबीने या कंपनीवर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. यात प्रवीण राऊत यांना १ कोटी रूपये देण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचे प्रकरण गाजत असताना संजय राऊत यांना आता इडीचा झटका बसु शकतो का? ते आता पुढे पहाणं महत्वाचे ठरेल.
Read also:
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
- आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
- उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;
- किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर
- ईडीपासून काळजी घ्या, एवढा अहंकार बरा नव्हे; राजू शेट्टींचा अजित पवारांना गंभीर इशारा