मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना इडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. आज नलाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर नवाब मलिक यांच्या लावलेले सर्व आरोप त्यांची मुलगी निलोफर मलिक यांनी फेटाळून लावले आहेत.
निलोफर मलिक म्हणाल्या की, ज्या पद्धतीने त्यांनी. आरोप केले आहेत त्या पद्धतीने आम्ही ती जमीन खरेदी केली नाही. नवाब मलिक हे काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या विरोधात लढत होते. त्यामुळे त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच त्यांची अटक देखील ही बेकायदेशीर असल्याची भावना निलोफर मलिक यांनी व्यक्त केली.
भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
त्या पुढे म्हणाल्या की, मी एक मुलगी म्हणून लढायला सक्षम आहे. सर्च वॉरंट घेऊन इडीचे अधिकारी आमच्या घरी आले. त्यानंतर त्यांना आँफिसमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना समोर सही करायला लावली. तसेच मला असं का वाटतंय की, प्रत्येक मुसलमानाला अंडरवर्ल्डशी जोडलं जातं? प्रत्येक मुसलमाला स्वतंत्र जगण्याचा हक्क नाही का? असा संतप्त सवाल ही त्यांनी केला. काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मलिक कुटुंबीयांना धीर दिला.
Read also:
- रशिया युक्रेन युद्धाचे विचलित करणारे दृश्य; सोशल मीडियावर व्हायरल
- संजय राऊत तुम्ही यापुढे आपली मुंबई म्हणू नका; नितेश राणेंचा टोला
- बांग्लादेशी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात मलिकांचा मोठा हात, लवकरच पुरावे देणार- मनोज कंबोज
- महावितरणचं कार्यालयचं पेटवलं; राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
- रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;